पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा, कर्जतकरांची एकमुखी मागणी

Published on -

कर्जत- जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा कर्जत येथे जाहीर निषेध करण्यात आला. उपद्रवी पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा त्यांचा नायनाट करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे संपूर्ण देश उभा आहे, केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी तमाम कर्जतकरांनी केली.

पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपले जीव गमवावे लागले, या पार्श्वभूमीवर आज कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्जत शहर व तालुक्यातील विविध संघटना, आजी माजी सैनिक संघटना, विविध राजकीय पक्ष, व्यापारी बांधव, सामाजिक कार्यकर्ते यांनी रास्ता रोको आंदोलन केले,
पाकिस्तानच्या निच कृतीचा काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला, पाकिस्तान अतिरेक्यांचे अड्डे आहेत, ट्रेनिंग सेंटर आहेत, त्यांना पाकिस्तानी सरकार नेहमीच साथ देत आहे त्यांचा कायमचा नायनाट करण्याची ही वेळ आहे.

केंद्र सरकारने यासाठी तात्काळ पावले उचलावीत असे आवाहन तमाम कर्जत करांनी केले. उपद्रवी पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा अशी एकमुखी मागणी कर्जतकरांनी केली, यावेळी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आंबादास पिसाळ, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे संस्थापक अध्यक्ष अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संदीप काळदाते, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ, भारतीय जैन संघटनेचे प्रसाद शहा, माजी सरपंच काकासाहेब धांडे, रिपाइंचे जिल्हाउपाध्यक्ष विशाल काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विशाल म्हेत्रे आदींची भाषणे झाली.

भारतीय जनता पक्ष किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू धुमाळ, तालुकाध्यक्ष अँड. बाळासाहेब शिंदे, पारनेर बँकेचे संचालक राजेंद्र जगताप, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विभीषण खोसे, बहिरोबावाडीचे माजी सरपंच विजय तोरडमल, नगरसेवक रज्जाक झारेकरी, राहुल नवले, भाजपा ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष शरद म्हेत्रे, शब्बीर भई पठाण, डॉ. नितीन तोरडमल, अँड. अशोक कोठारी, शरद तनपुरे, बनटी यादव, नामदेव थोरात आदी उपस्थित होते. अँड. धनराज राणे यांनी सुत्रसंचालन केले तर सकल मराठा समाजाचे समन्वय रावसाहेब धांडे यांनी आभार मानले. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News