तहसीलदार ज्योती देवरे म्हणाल्या सुजित झावरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-कांदा निर्यातीच्या प्रश्नावर निवेदन देण्यासाठी गेलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व तहसीलदार ज्योती देवरे यांची आज तहसीलदारांच्या दालनात हमरीतुमरी झाली.

तुम्ही कोणाच्या आशीर्वादाने वाळूचे हप्ते घेतात हे मला माहिती आहे, असा आरोप झावरे यांनी केला तर महिला अधिकाऱ्याला झावरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रत्यारोप तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला.

दरम्यान या प्रकारामुळे काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा असे शेतकर्‍यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी सुजित झावरे हे तहसीलदारांच्या दालनात गेले होते.

त्यांच्या समवेत सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे पाटील, अमोल साळवे, शंकर नगरे, सरपंच बाळासाहेब रेपाळे, सतीश पिंपरकर, दीपक नाईक, योगेश मते, उमेश सोनवणे, व कार्यकर्ते उपस्थित होते.

कलम 144 अनुसार दालनात गर्दी झाल्याने तहसीलदारांना निवेदन घेण्यास नकार दिल्याने झावरे हे आक्रमक झाले होते. त्यामुळे दोघांनीही जाहीरपणे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.

कोणाच्या दबावामुळे आपण निवेदन घेत नाही तसेच कोणाच्या आशीर्वादाने आपण वाळूचे हप्ते घेतात हे आपणास माहिती असल्याचे झावरे यांनी सांगताच तहसीलदार देवरे या संतप्त झाल्या.

झावरे यांनी फोनवर आपणास अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करीत त्याचे कॉल रेकॉर्डिंग आपणाकडे असल्याचे तहसीलदार देवरे यांनी सांगितले.दरम्यान या प्रकारामुळे तहसीलदारांच्या दालनात काही काळ मोठा गोंधळ उडाला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24