अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तहसीलदारांनी दिला कोरोनापासून बचावाचा मंत्र !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना किमान १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवल्यास  इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून आपण वाचवू शकतो. मुंबईतून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येते आहे.

त्यांच्यापासूत इतर नागरिकांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता आहे.  त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्यांना  किमान १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे असे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे म्हणाले.

डॉ. मंगरुळे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, अजूनही कोरोनाचा थोका संपलेला नाहो. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.

त्यामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता आहे. मुंबई येथून येणारे नागरिक मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळत आहेत. त्यामुळे चौदा दिवसांपर्यंतसंपूर्ण परिसर प्रतिबंधित असतो.

तसेच या परिसरातील सर्व दुकाने, सर्व व्यवहार बंद ठेवावे लागतात. याउलट  बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना किमान १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवल्यास  इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून आपण वाचवू शकतो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24