मुंबई: महिला वेटरनरी डॉक्टरसोबत झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांच्या एनकाउंटरमध्ये खात्मा झाला आहे. या नंतर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या एन्काउंटरचे समर्थन केले आहे. राज यांनी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले आहे. कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो, असे राज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पशुवैद्यक असलेल्या तरुणीवर चार तरूणांनी बलात्कार केला होता. यानंतर आरोपींनी या तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला होता.
या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते.