२४ तासांत दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत ३६३ ने वाढ होऊन उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २७९८ इतकी झाली आहे. दहा जणांचा मृत्यू झाला. 

आतापर्यंत १६८ जणांचा बळी गेला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४०, अँटीजेन चाचणीत २१६ आणि खासगी प्रयोगशाळेत १०७ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयात आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा १५, पाथर्डी २, नगर ग्रामीण १३, नेवासे २, पारनेर ५ आणि शेवगावच्या ३ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा १३, संगमनेर २५, राहाता ३१, पाथर्डी १९, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट १६, नेवासे ९, श्रीगोंदे १५, पारनेर १३, राहुरी ३, शेवगाव १०, कोपरगाव ३२, जामखेड २० आणि कर्जतच्या ८ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा ८५, संगमनेर ६, राहाता ४, श्रीगोंदे २, तर पाथर्डी, नगर ग्रामीण, श्रीरामपूर, नेवासे, पारनेर, अकोले, राहुरी, शेवगाव व कोपरगावच्या प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे.

कोरोनातून बरे झालेल्या ५३९ रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १०६२० झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७८.१७ टक्के आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24