श्रीरामपूर | राहाता तालुक्यातील नांदूर येथील आकांक्षा सोनल आवारे (वय १०) या बालिकेचा झोका खेळताना मृत्यू झाला.
रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झोका खेळताना बेशुद्ध पडल्याने आकांक्षाला साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2020/02/08/ahmednagar-breaking-corona-virus-suspected-patient-admits-to-hospital/