अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव जवळ तुकाई शिंगवे शिवारात स्कार्पिओ व ईनोव्हा या दोन गाड्याच्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले.
हि घटना आज दुपारी तीन वाजता घडली. नगर-औरंगाबाद महामार्गावर अहमदनगरहून येणारी स्कार्पिओ गाडी एम एच १६ बी.झेड ७७ तुकाईशिंगवे फाट्यावर
असताना औरंगाबादहुन भरधाव वेगात येणाऱ्या ईनव्हा गाडी एम एच १४ सी.एक्स २४८७ ने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला.
या अपघातात ईनव्हा गाडीतील चालक व एक जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमीना अहमदनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे यातील एकाची एकाची प्रकृती नाजूक आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com