‘त्या’रुग्णवाहिकेतून रस्त्यावर पडलेला ‘तो’ मृतदेह कोरोनाबाधित? ‘हे’आहे सत्य

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :  शहरातील बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मनपा यंत्रणा ते मृतदेह वारुळाचा मारुती परिसरात दफन करण्यासाठी नेते.

असाच एक अहमदनगर शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह दफन विधी करण्यासाठी मनपा रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असताना रुग्णवाहिकेचा दरवाजा अचानक उघडला आणि मृतदेह थेट रस्त्यावर पडला.

हा रस्ता वर्दळीचा असल्याने अचानक ही घडल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. हा मृतदेह कोरोनाचा की अन्य कोणता यावर बरीच चर्चा झाली.

त्यामुळे घाबररातही पसरली होती. याबद्दल माहिती देताना महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे म्हणाले, महापालिका प्रशासनाने मृतदेहाच्या विल्हेवाटीचा ठेका एका एजन्सीला दिला आहे.

रस्त्यावर पडलेला मृतदेह कोरोनाबाधिताचा नव्हता. तो बेवारस व्यक्तीचा मृतदेह होता. कोरोना संकटामुळे आता सर्वच मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत “सील’बंद केले जातात.

हा मृतदेह बेवारस असल्यामुळे त्याचे दफन वारुळाचा मारुती परिसरात करण्यात आले. याबाबत कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यापेक्षा, नवीन शववाहिनी खरेदी करा.

नवीन वाहन खरेदी न करणारे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावरच कारवाई करा असे शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24