‘त्या’ मुलीची पोलिसांनी केली सुटका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,18 जून 2020  पारनेर तालुक्‍यातील वाळवणे येथील फूस लावून अपहरण केलेल्या एका अल्पवयीन मुलीची सुपा पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, सोनू किसन आंग्रे. (वय २६) व धिरज निलेश शिंदे (वय २०, दोघे रा.वाळवणे, ता.पारनेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

लग्न करण्याचे आमीष दाखवून या दोन दोघांनी मंगळवारी (दि. १६) रोजी तिला जबरदस्तीने (एमएच १२ एचएन ९९८६) या कारमध्ये बसवून या आरोपींनी नेले, अशी तक्रार सुपा पोलीस ठाण्यात दाखल झाली.

त्यानंतर सूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले व त्यांच्या पथकाने तपास करुन या आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले व मुलीचीही सुटका केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24