‘त्या’ कांदा व्यापार्‍याने शेतकर्‍यांना लावला कोटींचा गंडा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- विश्वास संपादन करून जवळपास कोटभर रुपयांचा कांदा घेऊन शेतकऱ्यांना गंडा घालण्याचा प्रकार राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडला आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी: वांबोरी येथील मध्यवस्तीमध्ये रहात असणारे ‘ते’ कांदा व्यापारी गेल्या दहा वर्षांपासून कांदा खरेदीचा व्यवासाय करत आहेत.

ते नेहमीच शेतकऱ्यांकडून चढ्याभावाने कांदा खरेदी करत असल्याने आणि १० वर्षांपासून सम्पर्ग आल्याने कांदा उत्पादक शेतकरी या व्यापार्‍यांना अगदी विश्वासाने कांदा देत होते. याच विश्वासाने पैसे कधी दिले तरी चालतील,

पण आमचे कांदे घेऊन जा, असे शेतकरी या व्यापार्‍याला सांगत असत. याचाच फायदा घेत मागील वर्षापासून जवळ पास अंदाजे दहा कोटी रुपयांचा कांदा खरेदी केल्याचे शेतकरी चर्चा करीत आहेत.

काहींना एक दोन महिन्यांच्या तारखा टाकून चेक दिल्याचे समजते. तर काहींना चेक दिले होते. काही शेतकर्‍यांना चेक द्यायाचे राहिले आहेत.

आता त्या व्यापार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकर्‍यांनी आपल्या पैशाची मागणी करण्यासाठी त्यांच्या दुकानावर गर्दी केली असता ते व्यापारी या ठिकाणाहून पसार झाल्याचे निदर्शनास आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24