अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील करोना मुक्त झालेल्या एका रुग्णास बुधवारी बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
बुधवारी सायंकाळी पर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १७७ असून महानगर पालिका क्षेत्र ३५,
अहमदनगर जिल्हा ९२, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४० असे रुग्ण आढळले आहेत.
जिल्हयातील अॅक्टीव केसेस ८७ असून २ जण संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews