अहमदनगर लाईव्ह24 टीम/ पाथर्डी :- राज्य सरकारचे कर्जमाफीचे धोरण फसवे आहे. शेतकऱ्यांची शासनाकडून फसवणूक होत असल्याने मल्हारी बटुळे यांनी आत्महत्या केली. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री, तसेच जिल्ह्यातीलच असलेल्या महसूलमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे होते.
मात्र, शेतकरी आत्महत्यांपेक्षा त्यांना सरकार टिकवणे महत्त्वाचे वाटत असल्याने ते अद्याप फिरकले नाहीत. या प्रश्नावर चालू अधिवेशनात सरकारला जाब विचारू, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.भारजवाडी येथील मल्हारी बटुळे यांनी कर्जबाजारीपणामुळे चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
दरेकर म्हणाले, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला धीर देण्यासाठी सरकारकडून कोणी झाले नाही. मृत शेतकऱ्याच्या मुलांचा शैक्षणिक खर्च भाजपतर्फे करण्यात येईल. मल्हारी यांची पत्नी शिकलेली असल्याने तिला विखेंच्या शिक्षण संस्थेत नोकरी देण्याबाबत प्रयत्न करू. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सरसकट शेतकरी कर्जमाफीचे धोरण अवलंबले असते, तर असा प्रसंग घडला नसता.
दरेकर यांच्याबरोबर आमदार मोनिका राजळे, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, पांडुरंग खेडकर, सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, सुनील ओव्हळ, गोकुळ दौंड, रवींद्र वायकर, विष्णूपंत अकोलकर, सुभाष केकाण, भगवान साठे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, सहायक निबंधक भारती काटोळे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर, कृषी अधिकारी गजानन घुले यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com