अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- नेवासे तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकत असतांना अचानक आग लागून पेट्रोल डिलिव्हरी पाईप व मोटारसायकलने पेट घेतल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओची खातर जमा न करता कुकाणा येथील नामांकित नेत्याच्या नावासह ही घटना त्यांच्या पंपावर घडली असे शेअर करण्यात आले.
त्यामुळे झाले असे की, त्या नेत्यास तालुकाभरातून पत्रकार, टीव्ही चॅनेल व हितचिंतकांचे यांचे फोन सुरू झाले. प्रत्येकाला उत्तर देतादेता त्यांच्या नाकी नऊ आले. परंतु असे काही घडले नसल्याचे कळल्यावर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
काय आहे व्हिडीओ त्याचे झाले असे आज सकाळ पासून व्हॅटसप, फेसबुक या सोशल माध्यमांवर पेट्रोल भरत असतांना मोटारसायकल पेटल्याची व्हिडीओ फिरत आहे.
यात 24 जुलै 2020 रोजी सकाळी 9:36 वाजता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असतांना पेट्रोल डिलिव्हरी पाईप व मोटारसायकलने अचानक पेट घेतल्याचे दिसत आहे.
आग लागताच डिलिव्हरी बॉयने हातातील पेट्रोल डिलिव्हरी पाईप तर मोटारसायकलवर बसलेल्या तरुणाने मागे बसलेल्या आजोबासह गाडी सोडून दिली व आजोबाला घेऊन पळ काढल्याचे चित्र दिसत आहे.
त्याच बरोबर पंपावरील दुसऱ्या कर्मचाऱ्याने पंपावरील आग प्रतींबधक उपकरण फोडून आगीवर फवारा मारून आग विझली असे ही दिसत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com