अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : अगोदर पाहुणचार मग फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची नामुष्की कर्जत पोलिसांवर आली आहे
गेली अडीच महिने आपल्या अवती भोवती राहिलेल्या योगेंद्र सांगळे या युवकाविरुद्ध थेट पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याची खोटी माहिती देऊन थेट पोलीस यंत्रणेलाच भुरळ पडल्याचे उघड झाले त्यास अटक करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील राशीन येथे राहणाऱ्या योगेंद्र उपेंद्र सांगळे याने गेली अडीच महिन्यांपासून आपण पंतप्रधान कार्यालयामध्ये सीनियर एक्झिक्यूटिव्ह कार्यरत असल्याची माहिती देत थेट कर्जत तालुक्यातील पोलिसांना चांगलीच भुरळ घातली,
लॉकडाऊनच्या काळात गेली अडीच महिने त्याने पोलिसांचा चांगला पाहुणचार घेतला असताना दोन तीन दिवसापूर्वी याबाबत कर्जत पोलिसांना कुणकुण लागल्यानंतर माहिती घेण्यास सुरुवात झाली व अखेरीस पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असलेल्या या तोतया अधिकाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews