‘त्या’ अहवालातील १० लोकांना कोरोना !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : सोनईमध्ये एका 54 वर्षीय नोकरदाराचा मृत्यू झाला. हा औरंगाबादमधील गंगापूर भागातून आलेला असल्याने त्याच्या मृत्यूबाबत विविध शंका कुशंका घेण्यात येत आहेत.

त्या संशयास्पद मृत्यू झालेल्या इसमाचा जेथे जेथे संपर्क आला त्या संपर्कातील २० लोकांची तपासणी केली होती. गुरूवारी उशीरा त्यांचे अहवाल आले आहेत.

त्यापैकी दहा लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोनईकरांबरोबर बारा वाड्याचीही भीती वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने बुधवार 8 जुलैपासून सोनई येथील बाजारपेठा व व्यवहार बंद करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घोषित केला होता.

दरम्यान अहवाल प्राप्त होताच तहसीलदार रुपेश सुराणा आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी सोनई येथे पुढील प्रतिबंधक कार्यवाहीसाठी सोनईला येऊन पाहणी केली

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24