फरार ‘बाळा’ मुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडाने नगर जिल्हा चांगलाच हादरला आहे. यातच या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे गेल्या 15 दिवसांपासून फरार आहे.

बोठे याचा शोध अद्यापही न लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी बोठे याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह तपासी अधिकार्‍यांची पाच पथके रवाना करण्यात आली आहे.

पोलीस बोठेचा शोध घेत आहे मात्र चतुर बाळ शोधण्यात पोलिसांना यश येत नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या तपासाबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

बोठे याचा जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे त्याला तत्काळ अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. बोठेच्या अटकेसाठी पोलिसांनी जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यांत विविध ठिकाणी छापे टाकले.

परंतु, पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला बोठेच्या शोध घेण्यात पोलीसही हतबल झाले आहेत. बोठेच्या शोधासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासाची मदत घेतली आहे. त्याच्या संपर्कात असलेल्यांची पोलिसांनी चौकशी केली आहे.

परंतू, अद्यापतरी पोलिसांना तो सापडलेला नाही. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24