अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली.
धक्कादायक म्हणजे ही पीडिता ताच्या तावडीतून सुटून रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत फिरत होती. त्यांनतर तिला डॉ. धामणे दाम्पत्याने माउली सेवा प्रतिष्ठानमध्ये उपचारासाठी नेले.
यातील आरोपी अभय बाबूराव कडू (वय 58, रा. सिंहगड रस्ता, पुणे) याला तोफखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. याचे झाले असे, सोमवारी पहाटे अत्याचाराला बळी पडलेली संबंधित युवती कडूच्या तावडीतून निसटली.
निर्वस्त्र अवस्थेतच ती पहाटेच्या सुमारास स्टेशन रस्त्यावरील चांदणी चौकापर्यंत पळत गेली, तेथे ती आरडाओरड करीत होती. डॉ. धामणे यांनाही माहिती मिळाल्याने तेही अॅम्बुलन्स घेऊन तेथे आले होते.
तिकडे युवती हातून निसटल्याने कडूने पोलिसांना कळवून ती बेपत्ता असल्याचे सांगितले होते, त्यावरून पोलिसांकडे मिसिंग नोंद होती. त्या युवतीला मनगावमध्ये नेल्याचे समजल्यावर कडू तेथे पोहोचला.
त्याचवेळी त्या युवतीवर उपचार सुरू असल्याने तिची मनःस्थितीही ठीक नव्हती. यावेळी बोलताना कडूने संबंधित मुलगी आपल्या मित्राची असून, तिचा आपण सांभाळ करीत असल्याचे डॉ. धामणेंना सांगितले.
पण त्या मित्राचे नाव त्याला काही सांगता आले नाही. त्यामुळे डॉ. धामणेंचा संशय बळावला. तसेच त्याच्या बोलण्यात विसंगतीही दिसत होती. कधी त्या मुलीला औरंगाबादवरून आणल्याचे तर कधी मित्राची मुलगी असल्याचे तो सांगत होता.
या दरम्यान संबंधित मुलगी शुद्धीवर येऊन तिने कडूने केलेल्या अत्याचाराची माहिती दिल्यावर मग यातील गांभीर्य पाहून डॉ. धामणेंनी तातडीने हालचाली केल्या व पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी करत आरोपीस ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com