अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वाडगाव येथील ३८ वर्षीच्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने श्रीरामपुरातील प्रशासन पुन्हा सतर्क झाले. तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या सहावर पोहोचली आहे.
निपाणीवाडगाव येथील व्यक्तीला त्रास जाणवू लागल्यानंतर तो ग्रामीण आरोग्य रुग्णालयात गेला. वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत जमधडे यांनी तपासले असता त्यांना कोरोनाचा संशय आला.
त्याला पुढील तपासणीसाठी मंगळवारी नगर येथे पाठवण्यात आले. स्राव तपासला असता अहवाल पॉझिटिव्ह आला. ही व्यक्ती दोन-तीन वेळेला पुण्याला जाऊन आल्याची चर्चा आहे.
जवळच्या आठ नातेवाईकांना कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. श्रीरामपुरात आतापर्यंत सहा कोरोना रुग्ण सापडले आहेत. पैकी दोघेजण पुण्याला उपचारासाठी गेल्यानंतर त्यांची तेथे टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.
गोवर्धनपूर येथील गतिमंद मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्यानंतर औरंगाबादहून आलेला साधू, मुंबईहून आलेले दाम्पत्य, काही दिवसांपूर्वी येथील एका खासगी रुग्णालयातून पुण्याला उपचारासाठी गेलेल्या कांदा मार्केट परिसरातील वृद्ध पॉझिटिव्ह निघाला.
आता निपाणीचा व्यक्ती पॉझिटिव्ह सापडली. गोवर्धनपूर येथील युवकाचा व मागील आठवड्यात श्रीरामपुरातील एकाचा कोरोनासदृश आजाराने जीव घेतला आहे. ३७ शाळांमध्ये १५० खोल्यात शेकडो लोक क्वारंटाइन आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews