म्हणून अहमदनगर जिल्हा विभाजन प्रलंबितच राहणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एक नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी सुमारे ७०० ते हजार कोटी रुपये लागतात. नवा जिल्हा निर्मिती करणे सोपे नसते. नवीन जिल्हा बनवण्याची कुठलीच माहिती आमच्याकडे नाही.

त्यामुळे कुठलाही जिल्हा होण्याचा प्रश्नच नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हा विभाजनाबाबत स्पष्ट मत मांडल्याने नगर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांचे विभाजन पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात २८ नवी जिल्हे होणार आहेत. यावर महाआघाडी सरकारने कुठेच चर्चा केलेली नाही. आमचे पहिले प्राधान्य हे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आहे. यासह विविध विकास कामांना चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून स्वतंत्र जिल्ह्याबाबतच्या चर्चेशी राज्य सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

एक जिल्हा नव्याने तयार करण्यासाठी किमान १ हजार कोटी रुपयांचा खर्च येतो. एवढा पेसा आणायचा कोठून , असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वक्तव्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्हा विभाजनाचा प्रश्न पुन्हा प्रलंबितच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे.

दरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची नियोजन बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे झाली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24