अहमदनगर :- तपोवन रस्त्यावरील एका वसाहतीत राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून पाणी पिण्याचा बहाणा करून युवकाने महिलेचा विनयभंग केला.
संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बारस्कर असे आरोपीचे नाव आहे.
त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ढवणवस्ती येथील एका घरात आरोपी दूध घालण्याचे काम करत होता.
महिला घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी पाणी मागत घरात घुसून महिलेशी अश्लिल गैरवर्तन केले.