अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर शहर व परिसरात गुरुवार (दि.३ सप्टेंबर) रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील रस्ते संपूर्णतः जलमय झालेलं दिसले.
शहरासह सावेडी, केडगाव या उपनगरांमध्ये बहुतांश रस्त्यांवर पावसाचे पाणी साचलेले आहे.या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरासह नगर जिल्ह्यात उकडा चांगलाच वाढला होता. आज झालेल्या या दमदार पावसाने नगरकर सुखावले आहे.
अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.
आजच्या मुसळधार पावसामुळे शहरातील दिल्ली गेट, आनंदी बाजार, चितळे रोड, गोविंदपुरा पोलिस चौकी, पाइपलाइन रोड, रासनेनगर, पवननगर अशा विविध भागांमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved