चित्तोडगड :- राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विहिरीतून पोलिसांनी आईसह तिच्या दोन मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले.
तपास अधिकारी लाभुराम विश्नोई यांच्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी माताजी पांडोली येथील रहिवासी भैरुलाल तेली यांनी त्यांच्या बहिणीची पती व सासरच्या माणसांनी हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याची माहिती दिली होती.
पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता पोलिसांना कांता तेली यांच्यासह खुशी आणि दीपिका या दोन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आले.
तिघींचा मृत्यू बुडून झाल्याचे शवविच्छेदनामध्ये समोर आले आहे. यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.