बंद खोलीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द येथील बंद खोलीत रविवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. भिकन सखाराम बेेळे यांच्या वापरात नसलेल्या खोलीतून ग्रामस्थांना कुजलेला घाण वास येऊ लागला.

आतमध्ये डोकावून पाहिले असता मृतदेह आढळला. पोलिस तातडीने दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. ही व्यक्ती चार ते पाच दिवसांपूर्वीच मरण पावलेली असावी.

मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह कुजलेला असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. तातडीने अंत्यसंस्कारही करण्यात आले.

ही व्यक्ती कोण? कुठून आली? आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24