‘या’ कारणामुळे केली ‘त्या’ प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली आत्महत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील एका प्रेमीयुगलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर येळपणे परिसरात खळबळ उडाली आहे.

मनमाड दौड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात यांनी रेल्वेखाली जीव दिला असून राजू बाबा कोळपे (वय ३८) व राणी राजेंद्र साबळे (वय ३०) असे या प्रेमीयुगलाचे नाव आहे.

विवाहबाह्य प्रेमसंबंधाबाबत घरच्यांना समजल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील या प्रेमीयुगुलाने मध्यरात्रीच्या सुमारास नगर दौंड रेल्वेमार्गावर लोणीव्यंकनाथ शिवारातील महादेववाडी जवळ रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली सदर घटनेबाबत बापू कोळपे यांच्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पो उप नि अमित माळी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत पुढील सूत्रे वेगाने फिरवली मयत राजू व राणी यांचे मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते या अनैतिक संबंधांबाबत घरच्यांना माहिती समजली होती त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केली या घटनेबाबत सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24