अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- उत्त्तर प्रदेशच्या हपूर जिल्ह्यात एका नवविवाहितेचे अपहण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, हपूर जिल्ह्यात एका नवविवाहित तरुणीचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना रविवारी उघडकीस आली.
डीएसपी राजेश सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पीडित तरुणीचे 17 जानेवारीला लग्न झाले होते आणि लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिचे अपहरण झाले.
रविवारी सकाळी पीडित तरुणी अत्यावस्थ अवस्थेत सापडली. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे, असेही सिंह यांनी सांगितले.
Web Title – the-bride-abducted-and-gang-raped