अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या साडूचा निर्घृण खून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- मेहुणीबरोबर अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणारा साडूचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेतील आरोपीला कर्जत मध्ये अटक करण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कि, हडपसर पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बापू पांडुरंग बांगर, (वय : ३८, रा. बेनवडी ता. कर्जत) याने त्याचे मेहुणीबरोबर अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणारा साडू अनिल दादा पवार याचा हातोडीने हडपसर पुणे येथे खून केला.

त्यानंतर तो कोल्हापूर येथे पळून गेला होता. कोल्हापूर येथून तो कर्जत येथे आल्याचे पोलीस अंमलदार श्याम जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून समजले.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरोपीस सापळा रचून कर्जतच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलीस पथकाने कर्जत येथून शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.

दरम्यान या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशन, पुणे यांच्याशी संपर्क करून आरोपीस हडपसर पोलीस स्टेशनच्या टीमकडे त्याला सुपूर्द करण्यात आले. या गुन्हयाचा पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24