शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेले नवे कृषी विधेयक आधारभूत किंमत विनाआधार करणारे अाहे. संघर्षातून कामगारांनी मिळवलेले अधिकार नव्या कामगार कायद्याने संपुष्टात येणार आहेत.

फक्त भांडवलदारांच्या सोयीसाठी शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

मालुंजे येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारने शेती व कामगार कायद्याविरोधात २ कोटी स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करताना मंत्री थोरात बोलत होते.

तालुकाध्यक्ष प्रतापराव ओहोळ, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सभापती मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, शंकरराव खेमनर, अजय फटांगरे, आर. एम. कातोरे, शांताबाई खैरे, सुरेश थोरात,

गणपत सांगळे, शिवाजीराव थोरात, बाळकृष्ण दातीर, संतोष हासे, राजेंद्र चकोर, नवनाथ अरगडे यावेळी उपस्थित होते. मालुंजे, अंभोरे व डिग्रस बंधाऱ्यांचे जलपूजन मंत्री थोरातांच्या हस्ते करण्यात आले.

थोरात म्हणाले, भाजपने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना पहाटे रांगा लावायला लावल्या. एवढा त्रास देऊनही काही दिले नाही. उलट महाविकास आघाडीने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ केले.

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द आघाडी सरकार पाळणार आहे. केंद्राचे कृषी धोरण आधारभूत किंमत सोडून खासगीकरणाला प्राधान्य देणारे आहे.

भांडवलदारांसाठी लागू केलेले विधेयक आहे. धनदांडगे शेतमाल कमी दराने खरेदी करून साठवणूक करत चढ्या भावाने विक्री करतील, अशी टीका थोरातांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24