श्रीरामपूर :- तालुक्यातील गळनिंब व उक्कलगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे. मारकड वस्तीशेजारील भागात ठिकठिकाणी सात नवीन पिंजरे लावण्यात आले असून वन विभागाची टीमही याठिकाणी ठाण मांडून आहे; मात्र बिबट्या या सर्वांना हुलकावणी देत आहे. त्यामुळे परिसरता दहशत पसरली आहे.
बिबट्याने चिमुकलीला ठार केल्यानंतर गळनिंब परिसरातील लोक दहशतीखाली आहेत. लोकांनी केलेल्या आंदोलनानंतर परिसरात सात पिंजरे लावण्यात आले, तसेच वन विभागाचे कर्मचारीही परिसरात ठाण मांडून आहेत.
तरीही उक्कलगावसह गळनिंब परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. बिबटयाला जेरबंद करण्यासाठी उक्कलगावातील धनवाट परिसरातील थोरात वस्तीजवळ वनविभागाची टिम सज्ज झाली असून अहमदनगरचे वरिष्ठ अधिकारी याठिकाणी तळ ठोकून आहेत.
उपवनसंरक्षक रेड्डी यांनीदेखील परिसरावर लक्ष ठेवले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडुन कठोर पावले उचलली जात आहेत. सात पिंजरे असताना बिबट्या हुलकावणी देत आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची उक्कलगावसह गळनिंब परिसरात नियुक्ती करण्यात आली आहे. या टीममध्ये १५ अधिकाऱ्यांसह वनपाल परिसरात तळ ठोकून आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com