अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्याचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून तहसील कार्यालयाबाबत तक्रारी वाढल्या. त्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी तहसील कार्यालयाला भेट दिली.
अनेक त्रुटी लक्षात आल्यावर शेलार यांनी ‘पगार शासनाचा घेता, मग कामही शासनाचे करा’, असे खडेबोल सुनावले. मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असताना कामात दिरंगाई होत आहे.
शेलार यांनी तहसीलदार कार्यालयाला भेट दिली असता अनेक कर्मचारी गायब असल्याचे दिसले. नायब तहसीलदार, निवासी नायब तहसीलदारही हजर नव्हते.
सरकारी अधिकारी त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसतील तर सर्वसामान्य जनतेच्या समस्यां कोण सोडविणार असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved