अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :बाहेरच्या जिल्ह्यातुन आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करण्यासाठी शेवगाव शहरातील आखेगाव रोडवरील मंगल कार्यालयात विलगीकरण सेंटर उभारले होते.
गत काही दिवसांत या कक्षातील व्यक्ती कोरोना बाधित निघाल्याने मंगल कार्यालयाचा परिसर भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला होता. यामुळे आसपास भितीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडे विलगीकरण कक्ष तेथून हलवण्याची मागणी केली आहे.
शहरातील आखेगाव रोडवरील मंगल कार्यालय येथील विलगीकरण कक्षात असलेल्या एका २२ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यापूर्वी येथील तिघांना कोरोनाची लागण झाली.
आता तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ९ झाली. या व्यतिरीक्त मालेगाव (ता.गेवराई) येथील बाधित व्यक्तीने अधोडी येथील पत्ता दिला होता. याअगोदर विलगीकरण कक्षातील मुंबई येथून आलेल्या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
त्यानंतर ४० जणांना नगर येथे तपासणी करिता पाठविले होते. त्यातील ३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या कक्षातील कोरोना बाधितांची संख्या चारवर गेली आहे.
दरम्यान, शहरातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडे विलगीकरण कक्ष तेथून हलवण्याची मागणी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews