प्रदीपशेठ गांधी यांच्या निधनाने नगरच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून नगरचे नाव राज्यभरात नेणारे येथील प्रसिद्ध उद्योजक, कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदीपशेठ गांधी (वय 65) यांचे करोनाने निधन झाले.

चार दिवसांपासून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कापड व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या

कोहिनूर वस्त्रदालनासह विविध उद्योग-धंद्यांच्या माध्यमातून प्रदीपशेठ गांधी यांनी नगरच्या नावलौकिकात भर घातली. चार दिवसांपूर्वी उद्योजक प्रदीपशेठ गांधी यांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज (मंगळवार) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. नगरसह जिल्ह्यातील विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे.

यासाठी मोठी आर्थिक मदतही ते करत असत. शिवाय नगर शहराच्या पर्यटन, सांस्कृतिक विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असत.

प्रदीपशेठ गांधी यांच्या निधनाने नगरच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24