अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : सोनई मधील ‘त्या’ अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपार्गातील १० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता सोनईकरांचे धाबे दणाणले आहेत.
आता जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख हे सोनईतील बाधितांच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी स्वत:हून कोरोना चाचणीसाठी स्त्राव दिला.
आज हा अहवाल येणार असून याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एक अधिकारी कोरोना बाधित झाला आहे.
कोरोना ड्युटीमुळे काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत आलेला नव्हता परंतु आरोग्य विभागातील एक कर्मचारी या बाधिताच्या सोबत रात्रीच्यावेळी तपासणीच्या ड्युटीवर असून
हा कर्मचारी नियमितपणे जिल्हा परिषदेत येत असल्याने आता या कर्मचाऱ्याच्या आज येणाऱ्या अहवालाकडे जिल्हा परिषदेचे लक्ष लागले आहे. येणार असून याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष लागून आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews