अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात वाढीस लागलेला कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्यांवर पोहचले असून नव्या रुग्णांची रोजची हजारातील संख्या आता शेकड्यात आली आली आहे.
शहरासोबतच ग्रामीण भागातही करोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होता.
हळूहळू कोरोनाने वेग घेतला व दरदिवशी रुग्णसंख्या वाढू लागले. एक काल असा होता कि रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा जिल्ह्यावर लॉकडाऊनचे संकट ओढवले होते.
मात्र प्रशासनाची तत्परता कोरोना योद्धांचे अतुलनीय कार्य व नगरकरांची शिस्तप्रियता यामुळे जिह्यातील कोरोना हद्दपार होण्याचे दिशेने वाटचाल करू लागला आहे.
आता मात्र गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत लक्षणीय घसरण सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५६ हजार ८२ रुग्ण आढळून आले. त्यातील ५३ हजार ८४६ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१ टक्के आहे. ८६१ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved