डॉक्टरकडे मागितली दहा लाखांची खंडणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर : शस्त्रक्रिया झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टरकडे दहा लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर माळवे, रमेश गायकवाड, माधवी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी : दि. २१ ऑक्टोबर रोजी उर्मिला रमेश गायकवाड या महिलेला पोटदुखीचा त्रास होवू लागल्याने बेलापूर रस्त्यावरील अनारसे हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले होते.

तापसणीनंतर पोटात गोळा असल्याचे निदान झाले. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सदर महिलेची शहरातील एका खासगी रूग्णालयात फिटनेस तपासणी करण्यात आली.

त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येवून पोटातून गोळा काढला. सदर गोळा पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आला. दरम्यानच्या काळात महिला संजीवन रुग्णालयात दाखल होती.

मात्र, तिची तब्येत खालावल्याने नातेवाईकांनी तिला नगर येथे एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी हलविले. तेथेही तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला पुन्हा येथील संजीवन रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दि. २७ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा नवरा रमेश गायकवाड, मुलगी माधवी व समीर माळवे यांनी दि. २७ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर दरम्यान डॉ. संजय शंकर अनारसे यांना उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल न करण्यासाठी व हॉस्पिटलची बदनामी न करण्यासाठी दहा लाख रूपयांची मागणी केली.

तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी डॉ. अनारसे यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरूद्ध गु.र.नं. ८४७/२०१९, भादंवि कलम ३८४, ३८६, ३८९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उजे करीत आहेत.

अभिनेत्री केतकी माटेगावकर बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ?

अहमदनगर लाईव्ह 24