अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- शनिशिंगणापूर येथे असलेल्या दोन राजकीय गटामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीमध्ये नेहमीच राजकीय आखाडा रंगायचा. याचा विकास कामांवर परिणाम होत होता.
मात्र यंदाच्या वर्षी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व माजी विश्वस्त बापूसाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूर ग्रामपंचायत पंधरा वर्षांनंतर बिनविरोध झाली आहे.
मंत्री गडाख यांनी शनैश्वर देवस्थानसाठी गावातील मूळ रहिवासीच विश्वस्त होणार, अशी घटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने पूर्ववत करून आणल्याने गावातील सर्व विरोधक एका छताखाली आले आहेत. देवस्थान ट्रस्टकरिता ग्रामपंचायत गटाने अर्ज भरले नव्हते, तर ग्रामपंचायतीसाठी देवस्थान विश्वस्त गटाने अर्ज भरले नव्हते.