त्या नगरसेवकाला अतिक्रमण पडले महागात; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- अनधिकृतपणे जागेवर कब्जा करत संबंधित ठिकाणी अतिक्रमण करत व्यवसाय सुरु केल्यामुळे एका नगरसेवकाला आपले पद गमवावे लागले आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली आहे.

श्रीगोंदे पालिका हद्दीत विनापरवाना शेड उभारुन व्यवसाय केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक अशोक ऊर्फ आसाराम खेंडके यांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज अपात्र ठरविले.

खेंडके यांच्याविरुद्ध निवडणूक लढलेले राष्ट्रवादीचे उमेदवार अख्तर शेख यांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे याचिका केली होती. तसेच पालिका प्रशासनाकडेही तक्रार केली होती.

खेंडके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेख यांनी केली होती. त्यानुसार पालिकेने खेंडके यांना नोटीस बजावली. दरम्यान, या नोटिशीचा आधारे शेख यांनी नगरविकास खात्याकडे खेंडके यांच्यावर कारवाईची मागणी केली.

त्यावर नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचा आदेश दिला. आजच्या सुनावणीत शेख यांची मागणी मान्य करीत, जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी खेंडके यांना नगरसेवक म्हणून अपात्र घोषीत केले.

या बाबत खेंडके यांनी आपली बाजू मांडताना म्हणाले, की हा निर्णय अन्यायकारक आहे. मी कुठलेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. या निर्णयाविरुद्ध योग्य ठिकाणी अपिल करणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24