वासुंदे परिसराचा चेहरामोहरा बदलणार : आ. लंके

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील आदिवासी गोपाळदरा व परिसरात आदिवासी ठाकर व भिल्ल समाजाचे प्रमाण मोठे असून,  गेल्या ५० वर्षांपासून त्यांचे प्रश्न आजतागायत कायम आहेत, त्यामुळे यापुढील काळात वासुंदे व परिसरातील आदिवासी पट्टयाचा चेहरामोहरा बदलविण्याचे सूतोवाच आमदार नीलेश लंके यांनी केले.

वासुंदे (ता. पारनेर) येथील ठाकरवाडी व गोपाळदरा येथील आदिवासी बांधवांच्या वतीने शुक्रवारी भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी बांधवांच्या वतीने आ. लंके यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी शिव प्रहार संस्थापक अध्यक्ष संजीव भोर, उपसरपंच महादू भालेकर, जोगेश्वरी पतसंस्थेचे अध्यक्ष जालिंदर वाबळे, सरपंच राहुल झावरे, सेवानिवृत्त पो.नि. भाऊसाहेब लोंढे,  हरिभाऊ दुधवडे,  भागुजी झावरे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, पाराजी वाळुंज,  नारायण झावरे,  दत्तात्रय निवडुंग,  महेश झावरे,  अशोक जाधव,  सचिन सैद, धोंडीभाऊ मधे, डॉ. सुनील गांगड, पोपट साळुंके यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना आ. लंके म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून या आदिवासी पाड्यावरील रस्ते, पाणी, वीज हे प्रश्न प्रलंबित असून, प्राधान्य क्रमांकाने हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.

आदिवासी विकास प्रकल्प राजूर व समाजकल्याण विभागाच्या आदिवासी बांधवांसाठी असलेल्या योजना भविष्यकाळात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहू. तसेच यापुढील काळात आदिवासी बांधवांसाठी महसूल विभागाच्या वतीने मंडलमध्ये जातीच्या दाखल्यांसाठी व आधारकार्डसाठी स्वतंत्र शिबीर घेण्याचे आश्वासन आ. लंके यांनी या वेळी दिले.

हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24