अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात बैलगाडी पलटी होऊन चाक अंगावरून गेल्याने खडगाव (ता.शेवगाव) येथील शेतकरी विठ्ठल लक्ष्मण बोडखे (वय ५०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फॅक्चर झाला आहे.
त्यांचेवर शेवगावच्या खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांनी उधार उसनवार करून हॉस्पिटलच्या खर्चाची पूर्तता केली आहे. जिवावर बेतणारा हा दुर्धर प्रसंग अत्यंत गरीब कुटुंबातील शेतकऱ्यावर ओढवला.
नदीपात्रातील अनिर्बंध वाळू उपशामुळे खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी पलटी होऊन हा अपघात झाला. यासंदर्भात जखमी शेतकऱ्याचा मुलगा विजय बोडखे या
ने वाळू तस्कराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तहसीलदार अर्चना पागिरे यांचेकडे केली आहे. या दुर्घटनेनंतरही महसूल प्रशासन गप्प आहे.
कारवाई करण्यास कोणीही पुढे येत नाही, आपण दुसऱ्याकडे मोलमजुरी करतो, त्यामुळे वडिलांच्या ऑपरेशनचा खर्च आपल्याला पेलवणारा नाही. तहसीलदारांनी ही रक्कम वाळूतस्करांकडून वसूल करून आपल्याला द्यावी, अशी मागणी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved