अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार ; मुंबईवरून आलेल्या मुलास वडिलांनी ठेवले घराबाहेर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- मुंबई येथील 57 वर्षीय एक दुचाकीवर थेट राहुरीत आला. मात्र, वडिलांनी त्यास घरात प्रवेश नाकारला. त्यांनी दोन रात्री घराबाहेर काढल्या. येथे “होम क्वारंटाईन’चा शिक्का हातावर बसला.

मात्र, येथील निवारा केंद्रात थांबण्याऐवजी त्यांनी मुंबईची परतीची वाट धरली. राहुरी कारखाना येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची दुचाकी अडविली. प्रशासनाला कळविले.

अखेर त्यांची रवानगी नगरच्या जिल्हा रुग्णालयात झाली. संबंधित व्यक्तीने सांगितले, की ते स्टेट बॅंक ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट (मुंबई) येथे वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत.

मालाड येथे एकटेच राहतात. पत्नी व मुले स्वतंत्र राहतात. तनपुरेवाडी रस्ता (राहुरी) येथे वृद्ध वडील राहतात. त्यांच्या हृदयावर नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झाली.

त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी (ता. 24) सकाळी मालाडहून घोटीमार्गे दुचाकीवर रात्री 11 वाजता राहुरीत आलो. मात्र, वडिलांनी कोरोनामुळे शेजाऱ्यांच्या भीतीने त्यांना घरात घेतले नाही.

त्या रात्री एका मंदिराच्या पायऱ्यांवरच त्यांनी मुक्काम केला. शनिवारी ता. 25 संत गाडगेबाबा आश्रमशाळेतील अन्नछत्रात जेवण केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारला.

रात्रीचा मुक्काम राहुरी बसस्थानकात केला. आज आल्या मार्गी परतण्याचे ठरविले होते. मात्र, तत्पूर्वी त्यांना कार्यकर्त्यांनी अडविले. त्यांची रवानगी जिल्हा शासकीय रुग्णालयात केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24