अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- कोरोना मुळे अहमदनगर जिल्ह्यातील सध्याची स्थिती भयावह आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६५०८ व्यक्तींना कोरोनाची लागण झालीय आणि तब्बल २२६ रुग्णांना जीव गमवावे लागले आहेत.
अशातच कोरोनामुळे मरण पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करायचे कसे…? करायचे कोणी? हे प्रश्न तालुकास्तरावर प्रशासकीय यंत्रणेत समन्वय नसल्याने भेडसावत आहेत.
कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मृत शरीराला स्पर्श करण्याची परवानगी नसते मात्र श्रीगोंदा तालुक्यात अत्यंत संतापजनक प्रकरण समोर आले आहे
श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात देवदैठण येथील एका राजकिय नेत्यांच्या वडिलांचे गुरुवारी निधन झाले. या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने हात झटकले.
त्यामुळे अखेर त्यांचा कोरोनाबाधित मुलगा व एक कोरोनाबाधित रुग्ण यांनीच शुक्रवारी मध्यरात्री या रुग्णाची चिता पेटविली. त्यामुळे कोरोनामुळे मयत झालेल्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.
मयताचा मुलगा म्हणाला, मी कोरोनाबाधीत. माझ्यावर उपचार चालू असताना वडिलांचे कोरोनाने निधन झाले. श्रीगोंद्यात आम्हाला वडिलांचा मृतदेह अमरधामपर्यंत नेण्यासाठी गाडी मिळेना.
अमरधाम सरपण नव्हते. लाईट नव्हती. एका बाजूला वडील गेल्याचे दुख आणि दुसऱ्या बाजूला अंत्यसंस्कार करताना झालेली अवहेलना यामुळे अमरधाममध्य ढसाढसा रडलो.
दरम्यान शुक्रवारी पहाटे ग्रामीण रुग्णालयात कोरोनामुळे काष्टी येथील एकाचा मृत्यू झाला. या रुग्णावर शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा फिरवली नव्हती.
मयताच्या मुलाने संताप व्यक्त केला. अखेर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडीक यांनी खाजगी गाडीत मृतदेह नेऊन
श्रीगोंदा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले. या दोन्ही प्रकरणात कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved