अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही.
परंतु तालुक्यात सर्वत्र करोनाचे रुग्ण सापडत असताना साकुरी गाव त्याला अपवाद ठरले होते. परंतु आता साकुरी येथेही पहिला कोरोना रुग्ण आढळून आला आहे.
ह्या पार्श्वभूमीवर साकुरी गावामध्ये पाच दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या परिसरात रूग्ण सापडला आहे त्या परीसरात जंतूनाशक फवारणी केली आहे.
सदर रूग्ण हा शिर्डी येथे हॉटेलवर कामास होता त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने त्याला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.
तर त्याच्या कुटूंब व संपर्कात आलेल्या 10 जणांना विलागीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आज अहमदनगरमध्ये १०० रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.
जिल्ह्यात आता ७५४ ऍक्टिव्ह रुग्ण असून १ हजार २३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एकूण २ हजार २७ रूग्ण बाधित आढळले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com