अहमदनगर लाईव्ह 24 टीम / गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यापीठाची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती बुधवारी अखिल भारतीय ट्रान्सजेंडर शिक्षण सेवा स्ट्रटचे अध्यक्ष कृष्णा मोहन मिश्रा यांनी दिली.
या विद्यापीठात ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना पहिली ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेता येणार आहे. या विद्यापीठात ट्रान्सजेंडर व्यक्ती संशोधन करून पीएचडीची पदवीदेखील घेऊ शकतो.
पुढील वर्षी १५ जानेवारी रोजी ट्रान्सजेंडर समुदायाने पालनपोषण केलेल्या दोन मुलांना या विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे.
त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये इतर वर्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती यावेळी मिश्रा यांनी दिली.