अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांना काही दिवसांपूर्वी बँकेच्या परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली होती.
त्यानंतर गांधी व लांडगे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान आरोप – प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.
राजेंद्र गांधी व आशुतोष लांडगे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसात एकमेकाविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली आहे. त्यानंतर लांडगे यांनी पोलिसांना स्वतंत्र अर्ज देऊन गांधी यांनी 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.
या आरोपाबाबत समोरासमोर चर्चा करण्यासाठी येण्याचे आव्हान गांधी यांनी लांडगे यांना दिले आहे. उद्या मंगळवारी दि. 22 सप्टेंबरला ’50 लाखाची खंडणी’ या विषयावर समोरासमोर चर्चेकरिता आशुतोष लांडगे व
मिडीया प्रतिनिधी यांनीच फक्त यावे, असे आव्हान गांधी यांनी केले आहे. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता वाडिया पार्क जवळील महात्मा गांधी पूतळ्याजवळ या चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे.
सर्वांनी मास्क घालून यावे. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे आवाहन राजेंद्र गांधी यांनी केले आहे. दरम्यान आशुतोष काळे यांनी राजेंद्र गांधी यांच्यावर अनेक आरोप केले आहे, याबाबतच समोरासमोर चर्चेसाठी गांधी यांनी
लांडगे यांना आव्हान दिले आहे. दरम्यान, नगर अर्बन बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी पोलीस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ बँकेचे काही सभासद बँकेच्या प्रशासकांच्या दालनात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved