अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रवेश द्वाराचे गेट नं.१ ची एकेरी वाहतूक करण्याच्यादृष्टीने २०१८ मध्ये गेटची एक बाजू जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आली होती.
सदर गेट बंद असल्याने व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सदर गेट उघडण्याची मागणी व्यापाऱ्यांनी वारंवार केली होती. त्या गेटचे कुलूप शहर शिवसेनेने तोडून ते वापरासाठी खुले केले होते.
मात्र त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी कि, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला दोन गेट आहेत.
त्यातील एका गेटचा उपयोग हा बाजार समितीमध्ये प्रवेश करण्यासाठी केला जातो तर दुसऱ्या गेटचा उपयोग बाजार समितीमधून बाहेर पडण्यासाठी केला जातो. ही स्थिती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे.
पण गेल्या १० ऑक्टोबर २०१८ ला शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतुकीस अडथळा कारण दाखवत बाजार समितीच्या बाहेर पडण्याचा गेटला कुलूप लावलेले आहे.
परिणाम बाजार समितीत येण्यासाठी आणि बाजार समितीतून बाहेर जाण्यासाठी सर्व वाहतूकदारांना एकाच मार्गाचा वापर करावा लागत आहे.
त्यामुळे त्या चौकात वाहतूक सुरळीत होण्याऐवजी वाहतूक कोंडीच जास्त होताना दिसत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडीच वर्षापासून बंद असलेले
गेट शिवसेनेने आंदोलन करून कुलूप तोडून खुले केले होते. पण त्यानंतर आठवडाभरातच वाहतूक नियंत्रण शाखेकडून त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आलेले आहे.