अहमदनगर लाईव्ह 24 टीम: अयोध्येत चार महिन्यांत भव्य राममंदिर उभे राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केला.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकूड येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
राममंदिराच्या मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य करताना शहा म्हणाले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आता हे प्रकरण सुरू करू नका, असे म्हटले होते. मी त्यांना विचारतो की, राममंदिरामुळे तुम्हाला पोटदुखी का होते. शहा यांनी झारखंडमध्ये पुन्हा भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले.