अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचे पालकमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीचे पंचनामे केले.
तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच नुकसानभरपाई देवून त्यांखी दिवाळी गोड करू असे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात अद्यापही शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नसुन, पालकमंत्र्यांची ती घोषणा पोकळ ठरल्याचे वास्तव दिसून येत आहे.
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावशे,मलकापूर, आपेगाव, गरडवाडी या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी आसा प्रश्न शेतकऱ्यांमधुन विचारला जात आहे.
नुकसान भरपाईची घोषणा झाली तालुक्यातील काही गावांना नुकसानभरपाई मिळाली असली तरी ढोरजळगांव परीसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी या विवंचनेत शेतकरी आहेत.
पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी नुकसानग्रस्त भागाचा तातडीने दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल आसे आश्वासन दिले होते.
परंतु प्रत्यक्षात दिवाळी उलटुनही या परीसरातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत अद्यापही मिळालेली नाही. दरवर्षी पेक्षा यावर्षी अतिपाऊसामुळे हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिरावुन घेतल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असताना अजुनही या गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.
नुकसान भरपाई देण्याची नुसती घोषणाबाजी झाली असली तरी तालुक्याचे लोकप्रतिनिधीनी लक्ष घालुन शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी आशी मागणी होत आहे.