अहमदनगर लाईव्ह24 टीम :- साईंच्या भूमीत येऊन बंधिस्त विहिरीत दाढी, टक्कल करून व मिशा काढून आत्महत्या केलेल्या ४० वर्षे वयाच्या व्यक्तीच्या वारसांचा शोध कसा घ्यावा असा प्रश्न शिर्डी पोलिसांसमोर आहे.
या तरूणाने कोणत्या हेअर सलूनमध्ये दाढी, मिशा व डोक्यावरील केस काढले त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दि. २० फेब्रुवारी रोजी हॉटेल साईछायाच्या मागे असलेल्या गोंदकर यांच्या विहिरीत एका व्यक्तीने आत्महत्या केली.
तो किमान सहा दिवस पाण्यात पडलेला होता. शवविच्छेदनाच्या वेळी त्याच्या खिशात फक्त १५० रुपये आढळून आले. मात्र, ओळख पटेल अशी कोणतीही चिजवस्तु मिळून आली नाही.
घटनास्थळी पहाणी केली असता आत्महत्या केली अशा निष्कर्ष पोलिसांनी काढला असला तरी चेहरेपट्टीवरून हा व्यक्ती परराज्यातील असावा असे पोलिसांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com