राहुरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राहुरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याचे चिन्ह दिसत आहेत.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीदरम्यान संपूर्ण इमारतीच्या जागेची पाहणी केली.

सध्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांची डॉ. दिघावर यांच्याकडून वार्षिक तपासणी सुरू आहे. त्यानूसार काल १८ फेब्रुवारी रोजी दुपारी राहुरी पोलिस ठाण्याची तपासणी करण्यात आली.

पोलिस महासंचालक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी दप्तर तपासणी करून विविध गुन्ह्यातील मोटारसायकल व इतर वाहने असा मुद्देमाल न्यायालयीन कारवाई करून मालकाच्या ताब्यात देण्याच्या सूचना केल्या.

नंतर पोलिस वसाहतीची तपासणी केली. यावेळी काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी संपूर्ण जागेची पाहणी केली.

आणि पोलिस ठाणे इमारतीबाबत माहिती घेऊन सूचना केल्या. तसेच देवळाली प्रवरा येथील स्वतंत्र पोलिस ठाणे संदर्भात पुनर्प्रस्ताव पाठविण्याबाबत आदेश दिले.

तसेच राहुरी पोलिस ठाण्याच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र पोलिस वसाहतीची अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

अहमदनगर लाईव्ह 24