अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
श्रीरामपूर : वडिलांनी बोलाविले असल्याचे सांगून येथील एका शाळेत सहावीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. टिळकनगर येथील संविधान कॉलनीत काल दुपारी हा प्रकार घडला.
ही अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरी असता एक तरुण तोंडाला रुमाल बांधून लाल टी शर्ट व काळी जीन्स पॅन्ट परिधान करून दुचाकीवरून मुलीच्या घरी आला. तुला तुझ्या वडिलांनी तात्काळ बोलाविले आहे. चल लवकर सांगितले. मुलगी कोणताही विचार न करता लगेचच तरुणाच्या दुचाकीवर बसली.
अध्र्या तासानंतर तरुण आपल्याला कुठे घेऊन जात आहे हे मुलीने विचारले असता उडवाउडवीची उत्तरे भेटत असल्याने मुलगी घाबरली व नांदूर येथे जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तरुणाने लगेचच गावाच्या बाहेर मुलीला सोडून पळ काढला.
भयभीत झालेली मुलगी बाभळेश्वर रस्त्याला रडत जोरजोरात पळत सुटली. सूज्ञ ग्रामस्थांनी तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार व पत्ता सांगितला. त्यानंतर तिला घरी पोहोच करण्यात आले. या तरुणाला शोधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24