विद्यार्थ्याच्या चातुर्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर : श्रीरामपुरातील विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकणाऱ्या वरूण विशाल फोपळे (वय १७) याला अखंडानंद आश्रमाजवळ सायंकाळी मोटारीतून तिघानी तुझ्या आईने तुला घरी बोलाविले आहे असे सांगून अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता पण विद्यार्थ्याच्या चातुर्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला.

शहरातील वरूण विशाल फोपळे (वय १७) हा विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकत असून.त्याने खासगी शिकवणी लावली आहे.

तो खासगी शिकवणीसाठी अखंडानंद आश्रमाजवळ सायंकाळी पाच वाजता गेला असता एका मोटारीतून तिघेजण त्या ठिकाणी आले. त्यातील एकाने आपले नाव निलेश फिरोदिया असल्याचे सांगुन मी तुझा मामा आहे. तुझ्या आईने तुला घरी बोलावले आहे, असे सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24